ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी : आ. सत्तार

Foto
सिल्लोड येथे शिवसेना भवनात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

सिल्लोड (प्रतिनिधी) : हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते तथा पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, अशी भावना माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.

सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय ङ्गशिवसेना भवनफ येथे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नाना पाटेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख निर्माण केली. आपल्या अभिनयातून त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. 

त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका ज्येष्ठ आणि प्रतिभावान कलाकाराला आपण मुकलो आहोत, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. 

याप्रसंगी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरपरिषदेतील शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, नगरसेवक नंदकिशोर सहारे, नरेंद्र उर्फ बापू पाटील, शेख बाबू शहा, सुधाकर गायकवाड, सत्तार हुसेन, सुनील दुधे, राजेंद्र ठोंबरे, किशोर अग्रवाल, सचिन पाखरे, दुर्गाबाई पवार, लताबाई जाधव, अक्षय मगर, प्रशांत जोशी, रमेश ठाकूर, सुरेश शर्मा, पोपटराव साळवे, कृष्णा वाघ, दिलीप वाघ, राजू सुरडकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.